आपल्यापैकी किती जणींना वाटत असते कि कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना मोकळ्या वेळात स्वतः च स्वत्व जपणार अर्थांजनही करावं. अर्थात आपण स्त्रिया मुळातच काळजी वाहू आणि सर्वसमावेशकतेच्या पायावर उभ्या असतो म्हणून कौटुंबिक जबाबदाऱ्या झिडकारून बाहेर पडणं बऱ्याचदा आपल्याला अवघड असते.
कधीतरी फक्त परिस्थितीची मागणी असल्याकारणाने आपण मुलांना हि सोडून बाहेर अर्थार्जन करु लागतो मात्र आपल्या मनी आणि चित्ती असणाऱ्या आपल्या कुटुंबाचा ध्यास नेहमीच मनाची द्विधा मनस्थिती निर्माण करतो आणि आपल्याला मानसिक त्रासांना सामोरे जावे लागते.
मार्केटिंग विभागात १० वर्षे अविरत काम करण्याचा अनुभव असल्याने अश्या दोलायमान मनस्थितीत होणाऱ्या त्रासाला मी चांगलीच परिचित आहे. म्हणून ५ वर्षांपूर्वी एक कठोर निर्णय घेऊन मी मार्केटिंग विभागातील नोकरी सोडून देऊन मला आवडणाऱ्या योग विषयात शिक्षण घेऊन पुढे काम सुरु केले. ऑनलाईन स्वरूपात सगळे वर्ग घेणे सहज शक्य असल्यामुळे मला कौटुंबिक जबाबदारी पार पाडणे आणि अर्थार्जन दोन्ही करणे सहज शक्य झाले आणि मानसिक स्थिरता अनुभवता आली.
माझ्या सारख्यया अनेक स्त्रियांशी बोलल्यानंतर माझ्या लक्ष्यात आले कि ७० कोटी स्त्रियांची लोकसंख्या असलेल्या भारतात माझ्या सारख्या काम आणि कौटुंबिक जबाबदारीच्या मध्ये सॅन्डविच होणाऱ्या कोट्यवधी स्त्रिया आहेत. याच समस्येवर उपाय म्हणून पुढे गर्भसंस्कार शिक्षिका आणि योग शिक्षिका घडवण्याची संकल्पना सुचली. ज्यामुळे अनेक गृहिणी आणि अर्थार्जनाचा हातभार लागावा म्हणून पैसे मिळवण्यासाठी पर्यायी मार्गाच्या शोधात असलेल्या स्त्रियांना हा मार्ग मोकळा होईल.
अर्थार्जना सोबत कौटुंबिक जबाबदारी ह्या मुख्य धर्तीवर उभी असलेली हि संकल्पना सामाजिक जबाबदारी पूर्ण केल्याचा हि आनंद मिळवून देते, कारण येथे निवडलेले विषय समाजसाठी अत्यंत गरजेचे आहेत. तुम्ही एक गर्भ संस्कार शिक्षिका आणि योग शिक्षिका म्हणून जेव्हा या समाजात आपले योगदान देता तेव्हा भविष्यातील सुदृढ पिढी घडवण्याचेही सत्कार्य तुमच्या हातून घडत असते.
आज अनेक स्त्रियांना बाळंतपणात किंवा गर्भधारणा काळात योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे आवाहनात्मक पतिस्थितीला सामोरे जावे लागते. आणि अश्या वेळेस, तुम्ही अगदी आई किंवा आजी सारख्या त्यांच्या आयुष्यात येऊन अगदी वैज्ञानिक आधार असलेला गर्भसंस्कार करता हि भावना शब्दांत व्यक्त होणे अशक्यच.
गेल्या पाच वर्षांत अनेक स्त्रियांच्या आयुष्यातील भावनिक चढउतार आणि अधांतरी वाटणाऱ्या गर्भधारणा काळात त्यांना सोबत देण्याची आणि मार्गदर्शन करण्याची संधी मला लाभली आणि ईश्वर कृपेने अशीच लाभत राहील यावर माझा पूर्ण विश्वास आहे. ढासळत्या मानसिक आणि शारिरिक आरोग्याच्या काळात भविष्यात सुदृढ पिढ्याना घडविण्याची शक्ती आपल्या सारख्या अनेक जणींना आत्मसात करता यावी आणि त्यातून आत्मिक आणि सामाजिक प्रगती साधता यावी या उद्देशाने चला एकत्रित येवूयात.
प्राचीन अभ्यासावर आधारित आणि आधुनिक वैज्ञानिक आधार असलेल्या गर्भ संस्कार वर्गात प्रवेश घेउ इच्छिणार्यांनी संपर्क साधावा. आणि गर्भातूनच जगाचे भविष्य घडवुयात.
-योग शिक्षिका आणि फेर्टीलिटी एक्स्पर्ट ऋतुजा महाडिक.